अहिल्यानगर / प्रतिनिधी (शरद पाचारणे) : महाराष्ट्र राज्य कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षक संघाच्या महिला राज्य अध्यक्षपदी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीमती सुवर्णा गिरीश कळमकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दि. ५ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीत संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. निलेश गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.या वेळी श्रीमती कळमकर यांना निवडीचे पत्र देण्यात आले. या बैठकीस संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. निलेश गांगुर्डे (राज्य शिक्षक समन्वयक), अध्यक्ष जगदीश डांगे (सोलापूर), उपाध्यक्ष सुनील डांगरे (कोल्हापूर), नाशिक विभाग प्रमुख विजय खुडे, प्रमोद अहिरराव तसेच विविध जिल्ह्यांतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत प्रा. गांगुर्डे यांनी दिलेल्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने सर्व उपस्थित शिक्षकांना नवी ऊर्जा मिळाल्याचे सहभागी सदस्यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पुढील कार्य करण्याचा निर्धार शिक्षकांनी व्यक्त केला.राज्य महिला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रीमती सुवर्णा कळमकर यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या महिला विभागाचे कार्य अधिक सक्षमपणे पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.