ट्रकचालकाला बांधून २६ टन गहू लुटणारी टोळी जेरबंद; ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

चाकूचा धाक दाखवून ट्रकचालकाला लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; ४ जण अटकेत, ३५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : मध्यप्रदेशातून गहू घेऊन सोलापूरकडे निघालेल्या ट्रकचालकाला चाकूचा धाक दाखवत हातपाय बांधून तब्बल ९ लाखांहून अधिक किमतीचा गहू लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून ट्रकसह ३५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.फिर्यादी जगदीश चतुर्भुज माळी (रा. मध्यप्रदेश) हे ट्रक क्रमांक आरजे 09 जीई 5957 मधून गहू घेऊन जात असताना २७ जानेवारीच्या रात्री टोळक्याने वाहन अडवून चालक व क्लिनरला चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. त्यांचे हातपाय बांधून ट्रकमधील ९५३ पोती गहू लुटून आरोपी फरार झाले. या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या आधारे पोलिसांनी मध्यप्रदेशातील अर्जुनसिंग सरदार रा. कोलारस, जि. शिवपुरी व त्याचे साथीदारांनी सदरचा गुन्हा केल्याची माहिती प्राप्त झाली त्या आधारे आरोपींचा माग काढत अरनगाव परिसरात ट्रकसह दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली. सर्व आरोपींना अटक करण्यात आली.आरोपींकडून सुमारे २६ टन गहू (१०.४० लाख रुपये), २५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ३५.४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पोउपनि अनंत सालगुडे, संदीप मुरकुटे, महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, गणेश थोत्रे, विष्णु भागवत, विजय पवार, दिपक घाटकर, फुरकान शेख, राहुल डोके, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डीले, विशाल तनपुरे, रमिझराजा आतार, प्रशांत राठोड, अरुण मोरे, भगवान धुळे, उत्तरेश्वर मोराळे यांच्या
पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *