राहुरी वेब प्रतिनिधी ,१० ऑक्टोबर (शरद पाचारणे) – “खेळ सोशल मीडियाचा, प्रश्न कुटुंब व्यवस्थेचा” या विषयावर राहुरी पोलिस ठाण्याच्या वतीने आणि शिक्षण विभागाच्या सहकार्याने घेतलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव ‘शब्दसुर – गाणी, गप्पा आणि बरंच काही’ या बहारदार मैफिलीत करण्यात आला.
माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान भाग २’ या जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सजगतेचा संदेश पोहोचविण्यात आला.
गेल्या आठवड्यात राहुरी पोलिस स्टेशन व शिक्षण विभागाने तालुक्यातील ७० शाळांमधून तब्बल १७,३०० विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले. या स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान ‘शब्दसुर’ कार्यक्रमात झाला.
विजेते विद्यार्थी पुढील प्रमाणे गट क्र 1.इ.5 वी ते इ.8 वी निबंध स्पर्धा 1)आराध्या आकाश लालबागे – सौ. भागीरथीबाई तनपुरे कन्या माध्यमिक विद्यालय राहुरी -प्रथम क्रमांक2) उत्कर्ष नितीन कांबळे- सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरी- द्वितीय क्रमांक 3) पायल संदीप शेजवळ- जि प प्राथशाळा कोंढवड – तृतीय क्रमांक 4) सिद्धी राजेंद्र टेमक न्यू इंग्लिश स्कूल देवळाली प्रवरा-उत्तेजनार्थ चित्रकला स्पर्धा1) गौतमी राजेश जोशी-सौ भागीरथीबाई तनपुरे कन्या माध्यमिक विद्यालय राहुरी-प्रथम क्रमांक 2) स्वरांजली संदीप इरोळे-सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरी-द्वितीय क्रमांक 3) जुईली भीमराव शेळके -विद्या मंदिर प्रशाला राहुरी-तृतीय क्रमांक 4) अथर्व रवींद्र पाटील -नंदकुमार पवार इंग्लिश मीडियम स्कूल देवळाली प्रवरा-उत्तेजनार्थ *वकृत्व स्पर्धा 1) शरण्या सुंदरदास करंडे-सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरी-प्रथम क्रमांक 2) वैशाली भिमराज म्हसे- जि प प्राथ शाळा कोंढवड -द्वितीय क्रमांक 3) रिया पंकज गुंदेचा -संस्कृती फाउंडेशन इंग्लिश मीडियम स्कूल राहुरी-तृतीय क्रमांक 4) वैष्णवी विजय दुबे -शाहू माध्यमिक विद्यालय खडांबे-उत्तेजनार्थ
गट क्र.2 इ. 9 वी ते 12 वी निबंध स्पर्धा 1) शिंदे गौरी अनिल-सौ. भागीरथीबाई तनपुरे कन्या माध्यमिक विद्यालय राहुरी-प्रथम क्रमांक 2) भक्ती मनोज अडसुरे- विद्या मंदिर प्रशाला राहुरी-द्वितीय क्रमांक 3) सायली सुभाष अंगारखे -छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवरा- तृतीय क्रमांक 4) घोलप अमृता किरण- आर्यअकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल मांजरी-उत्तेजनार्थ
चित्रकला स्पर्धा 1) चौधरी पूर्वा मनोज-कै. विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूल ब्राह्मणी-प्रथम क्रमांक 2) सिनारे राजेश्वरी अनिल-न्यू इंग्लिश स्कूल देवळाली प्रवरा-द्वितीय क्रमांक 3) कोहकडे ईश्वरी अशोक-विद्या मंदिर प्रशाला राहुरी-तृतीय क्रमांक 4) श्रद्धा सुरेश आघाव -संस्कृती फाउंडेशन राहुरी-उत्तेजनार्थ
वकृत्व स्पर्धा1) धनश्री पोपट पाटे-अष्टविनायक इंग्लिश मीडियम स्कूल तांदुळवाडी-प्रथम क्रमांक 2) वैष्णवी शिवनाथ डमाळे-अंबिका माध्यमिक विद्यालय मानोरी-द्वितीय क्रमांक 3) ईश्वरी सचिन मोकाटे-आदर्श माध्यमिक विद्यालय ब्राह्मणी-तृतीय क्रमांक 4) भक्ती सुरेश गाढवे-सौ भागीरथीबाई तनपुरे कन्या माध्यमिक विद्यालय राहुरी-उत्तेजनार्थ तसेच शाळा स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धा मध्ये सहभागी विद्यार्थ्यांना शाळा स्तरावर प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
खेळ सोशल मीडियाचा प्रश्न कुटुंब व्यवस्थेचा या विषयावर तालुक्यातील 70 शाळांमध्ये सुमारे 17300 मुलांना सहभागी करून त्यांच्याकडून निबंध चित्रकला तथा वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करत सदर जनजागृती मोहीम ही लोक चळवळ बनवली .सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा राहुरी तालुका कलाकार मंच व केअर संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शब्दसुर’ कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्नेहालय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे कुटुंब व्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांवर भाष्य करत सजगतेचा संदेश दिला. त्यांनी पोलिस विभागाच्या या जनजागृती उपक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जयदत्त भवर, तहसीलदार श्री. नामदेवर पाटील, गटशिक्षणाधिकारी श्री. मोहिनीराज तुंबारे तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या यशस्वी उपक्रमासाठी समन्वयक श्री. गुलदगड सर, परीक्षक श्रीमती वंदना कांडेकर व श्री. गणेश शिंदे, तसेच अरुण तुपविहिरे सर, श्री. होन सर आदींचे विशेष योगदान राहिले.कार्यक्रमाचे नियोजन श्री.वसंतराव झावरे सर, अन्वर भाई, मयूर ठेंगे ,पुणे, डॉ. महेश वडोदरे व सोनल झावरे यांनी केले. तसेच स्थानिक कलाकार, साऊंड, लाईट्स, स्टेज व केटरिंग व्यवस्थापन करणाऱ्या सर्वांचे केअर संस्था व राहुरी तालुका कलाकार मंच यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. ‘समाजातील प्रत्येक कुटुंब सुरक्षित, सशक्त आणि सजग व्हावे हा ऑपरेशन मुस्कान २ चा खरा हेतू आहे’ असा संदेश देत कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम’ गीताने झाली.