साई लॉजिंगवर अपर पोलीस अधीक्षक पथकाचा छापा; कुंटणखान्याचा पर्दाफाश,३ महिलांची सुटका

खडका फाटा,ता.नेवासा (नेवासा वेब टिम) ३० ऑक्टोबर २०२५ :- खडका फाटा येथील साई लॉजिंगवर पोलिसांनी छापा टाकत देहव्यापाराचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून हॉटेल मालक व मॅनेजर या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूरचे मा. श्री. सोमनाथ वाघचौरे यांच्या कार्यालयाच्या पथकाने मंगळवारी (दि. २९ ऑक्टोबर) केली.
अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार साई लॉजिंग येथे काही व्यक्ती महिलांना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापार करण्यास प्रवृत्त करत असल्याचे समोर आले होते. यानंतर त्यांनी तात्काळ विशेष पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.
अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पो.हे.कॉ. दादासाहेब लोंढे, पो.ना. संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र विरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण यांचे पथक नेवासा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खडका फाटा येथे गेले.
पथकाने ठिकाणी एक बनावट ग्राहक पाठवून हॉटेलमधील परिस्थितीची खात्री केली. त्यानंतर पंचासमक्ष साई लॉजिंगवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत हॉटेलच्या खोल्यांमधून तीन महिला सापडल्या. चौकशीत त्यांनी आर्थिक गरजेतून देहव्यापार करत असल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ या महिलांची सुटका केली.
या प्रकरणी हॉटेल मालक बाळासाहेब भानुदास जाधव (वय २५, रा. मक्तापुर) आणि मॅनेजर विकास योगेश उर्फ यहुवा औताडे (वय २५, रा. मक्तापुर) यांना अटक करण्यात आली आहे. दोघांविरुद्ध स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा १९५६ मधील कलम ३, ४, ५, ७, ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील (नेवासा पोलीस स्टेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *