अहिल्यानगर वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे), दि. २८ ऑक्टोबर:
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिशिंगणापुर परिसरात कारवाई करत गावठी पिस्टल विक्रीसाठी आलेल्या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे असा एकूण ₹६४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने केली.गुप्त माहितीच्या आधारे भारत सोपान कापसे (वय २७, रा. कांगोणी, ता. नेवासा) हा इसम गावठी पिस्टल विक्रीसाठी फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून त्याला पकडले. चौकशीत त्याने दोन गावठी पिस्टल आणि आठ काडतुसे आपल्या घरात ठेवली असल्याची कबुली दिली.त्यानुसार आरोपीच्या घरातून ₹६०,००० किमतीच्या दोन गावठी पिस्टल व ₹४,००० किमतीची आठ जिवंत काडतुसे असा एकूण ₹६४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी पोना (क्र. ४३७) सोमनाथ आसमानराव झांबरे, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी शनिशिंगणापुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असून आरोपीवर आर्म्स अॅक्ट कलम ३/२५, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शनिशिंगणापुर पोलिस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.या कारवाईत पो.उपनि. दिपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, शाहिद शेख, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, विशाल तनपुरे, भगवान थोरात, रमिझराजा आतार, प्रशांत राठोड व महादेव भांड या पथकाने सहभाग घेतला.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे आणि पोलीस अधीक्षकांच्या निर्देशांमुळे शक्य झाल्याचे नागरिकाकडून सदर कारवाई चे कौतुक होत आहे.