राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे),१७ ऑक्टोबर २०२५ :-
माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या प्रेरणा अर्थ परिवारातील तिन्ही संस्था ,प्रेरणा पतसंस्था, प्रेरणा मल्टिस्टेट, आणि प्रेरणा विविध कार्यकारी सेवा संस्था यांच्याकडून सभासदांना नियमित लाभांश वाटप करण्यात येत असून, हा आमच्या विश्वासार्हतेचा व पारदर्शक कारभाराचा अभिमान असल्याचे संस्थापक सुरेश वाबळे यांनी सांगितले.प्रेरणा अर्थ परिवाराच्या लाभांश वाटप कार्यक्रमाचे आयोजन सुरेश वाबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. या वेळी प्रेरणा मल्टिस्टेटचे चेअरमन सुजीत वाबळे, प्रेरणा पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन मछिंद्र हुरुळे, प्रेरणा मल्टिस्टेटचे व्हा. चेअरमन प्रा. वेणुनाथ लांबे, तसेच प्रेरणा सेवा संस्थेचे व्हा. चेअरमन अशोक उर्हे आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना सुरेश वाबळे म्हणाले,“गेल्या ३२ वर्षांत प्रेरणा पतसंस्थेने काटकसरीचा, पारदर्शक व आर्थिक शिस्तीचा उत्तम आदर्श घालून दिला आहे. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या मार्गदर्शनामुळेच आज संस्था तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातही अग्रस्थानी आहे. प्रेरणा परिवार नेहमीच शेतकऱ्यांच्या सुखदुःखात सोबत राहिला आहे. दुष्काळ असो वा अतिवृष्टी, संस्थेने शेतकऱ्यांच्या पाठीशी आर्थिक मदतीचा हात दिला आहे.”प्रेरणा पतसंस्थेकडे आजघडीला १२५ कोटी रुपयांच्या ठेवी असून या वर्षी वांबोरी, ब्राम्हणी आणि देवळाली प्रवरा येथे तीन नवीन शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. येत्या ३१ मार्च २०२६ पर्यंत संस्थेचा १५० कोटींचा टप्पा पार होईल, असा विश्वास वाबळे यांनी व्यक्त केला.संस्थेने कर्ज वाटप करताना कोणताही राजकीय हस्तक्षेप न होता केवळ नियमानुसार कार्यवाही केल्याने वसुलीबाबत अडचण येत नसल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाला संचालक विष्णुपंत वर्पे, अशोक आंबेकर, भाऊसाहेब उर्हे, भास्कर इरुळे, मारूती लांबे, जालिंद्रर वर्पे, अशोक चंद्रे, भाऊसाहेब चंद्रे, मच्छिंद्र वरघुडे, भागवत गागरे, अक्षय ओहळ, शरद वाबळे, संकेत चंद्रे तसेच तिन्ही संस्थांचे सभासद, ग्रामस्थ व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. विशाल वाबळे यांनी मानले.