शरद पवारांच्या निष्ठावंत जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचा राजीनामा

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे) १५ ऑक्टोबर २५: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. तब्बल सात वर्षे पदावर राहिल्यानंतर त्यांनी नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी व कौटुंबिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. पक्ष फुटीनंतरही फाळके यांनी अजित पवारांचा प्रस्ताव नाकारत शरद पवारांसोबत निष्ठा राखली होती.लोकसभा निवडणुकीत नीलेश लंके यांना पक्षाकडे परत आणण्यात व त्यांच्या विजयात फाळके यांचा मोठा वाटा होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *