राहुरी पाणी आंदोलनातील आरोपी निर्दोष मुक्त!

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे) १५ ऑक्टोबर २५: सन २०१२ मध्ये राहुरी तालुक्याच्या हितासाठी पैठण धरणाचे पाणी बंद करून डावा कालवा तसेच उजवा कालवा पाणी सोडण्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात सहभागी असलेले तत्कालीन आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी खासदार प्रसाद तनपुरे, कैलासवासी शिवाजीराव गाडे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलकांना अटक झाली होती. याप्रकरणी आज अहमदनगर जिल्हा सत्र न्यायाधीश शेख साहेब यांच्या न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे, त्यामुळे राहुरी तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
या प्रकरणात अडव्होकेट महेश तवले आणि ॲड. जालिंदर ताकटे यांनी कायदेशीर कामकाज पाहिले. निर्दोष मुक्तता झालेल्यांमध्ये माननीय आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, शेतकरी नेते  रविंद्र मोरे,आरपीआयचे सुरेंद्र थोरात, रावसाहेब उर्फ चाचा तनपुरे, सिताराम भाऊ ढूस , आसाराम भाऊ ढूस , प्रा. चांगदेव भोंगळ सर, सोन्याबापू जगधने, डॉक्टर जयंत कुलकर्णी, डॉक्टर धनंजय मेहेत्रे, अण्णासाहेब बाचकर,ॲड. तानाजी ढसाळ, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नितीन तनपुरे, सर्जेराव घाडगे, सूर्यभान गाडे, प्रवीण लोखंडे, दत्ता जोगदंड, विजय डौले , शहाजी कदम यांच्यासह इतर आरोपींचा समावेश आहे.
राहुरीच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी केलेल्या या आंदोलनाच्या प्रकरणातून प्रमुख नेत्यांसह सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आणि राहुरी तालुक्यात सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी केलेल्या संघर्षाला न्यायालयाने न्याय दिल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *