राहुरी नगरपरिषदेच्या मतदार यादीत मोठा घोळ ? अनेक रहिवाशांची नावे चुकीच्या प्रभागात 

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे),१२ ऑक्टोबर २५ :- राहुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर झालेली असून या यादीत अनेक घोळ असून जे मतदार अनेक वर्ष ज्या प्रभागातून कायमचे मतदान करतात किंवा त्या प्रभागातील कायमचे रहिवाशी असताना त्यांची नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याने त्या मतदारांची व संबंधित संभाव्य उमेदवाराची धावपळ सुरु असून अश्या नावांवर हरकत घेण्यासाठी अवघे दोन दिवसच उरले आहे. १३ ऑक्टोबर २०२५ ही अंतिम तारीख आहे.प्रभागातील मतदारांची नावे दुसरीकडे गेलीच कशी ती कोणी अन्यत्र हलविली त्यास जबाबदार कोण?शहरातील प्रभाग ५ मधील एक नाही दोन नाही तर चक्क ४००ते ५०० मतदारांची नावे प्रभाग ४ व प्रभाग ६ व प्रभाग १२ मध्ये समाविष्ट झाली आहेत. मूळ प्रभाग सोडून अन्यत्र समाविष्ट झालेल्या मतदारांना न्याय मिळणार का?       
राहुरी शहरातील नगरपरिषद  सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता नवीन प्रारूप मतदार याद्या जाहीर झालेल्या आहेत. या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे इतर प्रभागामध्ये समाविष्ट झालेली आहेत. प्रभाग क्रमांक ५ (संत सावता महाराज,)या प्रभागामधील वैजनाथ मंदिर शिवाजी चौक विद्या मंदिर प्रशाला परिसर  मठ गल्ली, जंगम गल्ली तसेच शिवाजी चौक लोहार गल्ली रामबुवा मंदिर परिसर, या भागातील मतदारांची नावे इतर प्रभाग ४ व प्रभाग ६ व १२मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत.प्रभाग ५ मधील अन्य प्रभागात समविष्ट झालेले मतदार बहुतेक मतदार ह्यांचे वास्तव्य जर वर्षनुवर्षं त्याच प्रभागात असताना यावेळी त्यांची नावे प्रभाग ४ व प्रभाग ६ व १२ मध्ये कोणत्या आधारावर समाविष्ट केली गेली. शासनाने प्रभाग रचना करताना वरील सर्व नावे ही शासनाने जाहीर केलेल्या प्रभागात राहत असताना काही नावे अन्य ठिकाणी समविष्ट होऊ शकतात पण एकाच वेळी प्रभाग ५ मधील जवळपास ७०० मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात कोणत्या आधारे समाविष्ट केली गेली यास जबाबदार कोण?वास्तविक देशात मतदार यादीचा घोळ उघडकीस आल्यावर सुद्धा स्थानिक संस्था निवडणुकीत हा घोळ जाणूनबुजून कोणी केला याचे उत्तर शासनास घ्यावे लागेल.वास्तविक शासनाने राहुरी नगरपालिकेची प्रभाग रचना करताना वरील अन्य प्रभागात समविष्ट झालेले मतदार जर त्याच प्रभागात ५ मधील रहिवाशी असल्याच्या पुरावा असून सुद्धा त्यांना अन्य प्रभागात का समविष्ट केले गेले.असाच प्रकार शहरातील अन्य प्रभागात असून त्याचे प्रमाण कमी जास्त आहे फक्त हा अन्याय प्रभाग ५ मधील मतदारांवर झालेला असून याची चौकशी झालीच पाहिजे. अशी मागणी मतदारां कडून होत आहे.ज्या मतदारांची नावे अन्य प्रभागात समविष्ट झाली आहेत अश्या प्रत्येकाने आपली मतदार यादीतील नावे खात्री करून घ्यावीत जर इतर प्रभागामध्ये नाव समाविष्ट झालेले असेल तर त्याकरिता नवीन दुरुस्ती फॉर्म १३ तारखे पर्यंत भरून द्यावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *