बाभळेश्वर वेब टीम ,१२ ऑक्टोबर २५ : श्रीरामपूर दूध जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध व्याव. संघ मर्यादित बाभळेश्वर ता. राहाता, जिल्हा अहिल्यानगर या संघाने पाच दशके शेतक-यांच्या जिवनात व दूध उत्पादनात दुधक्रांती घडवून अमुलाग्र बदल केले. तसेच शेतक-यांचे जीवनमान उंचविण्यासाठी तसेच शेतीस जोडधंदा म्हणून शेतक-यांच्या उत्पादनात भर घालण्याचे प्रयत्न करुन शेतक-यांचे राहाणीमान उंचावले याकामी दूध उत्पादकांचे नेते व संघाचे मार्गदर्शक श्री. रावसाहेब पाटील म्हस्के यांचे पाच दशके अथक प्रयत्नातून दूध उत्पादकांचे हित साध्य झालेले असून संघास मोलाचे योगदान लाभले आहे. अशा या संस्थेचा आज ५० वा वर्धापन दिन साजरा होत आहे. आज मितीस दिनांक ११.१०.२०२५ रोजी सुवर्ण महोत्सवी ( गोल्डन ज्युबली) वर्ष पूर्ण झाल्या निमित्त संघाचे चेअरमन व राहाता तालुका राष्ट्रवादीचे कॉंग्रेस चे अध्यक्ष श्री. सुधीर रावसाहेब म्हस्के व संचालक मंडळ तसेच संघाचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत सुवर्ण महोत्सव दिन विधीवत पुजा करुन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध मान्यवर व दूध उत्पादक शेतकरी व संघाचे हितचिंतक, सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.