राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे)०९ ऑक्टोबर २५:- राहुरी: राहुरी येथील व्यंकटेश ग्रुपच्या वतीने ब्रह्मोत्सवानिमित्त तिरुपती येथे राहुरीच्या दहा महिलांना बालाजी पद्मावती मंदिरात सेवा करण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. हा योग केवळ योगायोग असून, त्यासाठी मनीषा भुजबळ यांचे मार्गदर्शन या महिलांना लाभले. ही संधी मिळाल्याने या महिलांचा आनंद द्विगुणित झाला आहे.या महिलांना तिरुपती येथील जुने बालाजी मंदिर आणि पद्मावती मंदिर येथे सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांची राहण्याची सोय विष्णू सदन येथे करण्यात आली होती.या सेवाकाळात महिलांनी अन्नदान, चौकशी कक्ष , आणि बुकिंग काउंटर अशा विविध ठिकाणी सेवा दिली. याव्यतिरिक्त तुळशी सेवा, पुष्प सेवा आणि काजू कापणी अशा धार्मिक आणि स्वयंसेवेच्या कार्यांमध्येही त्यांनी सहभाग घेतला.या सर्व सेवांनंतर या महिलांना तिरुपती व्यंकटेश बालाजी यांच्या मुख्य गाभाऱ्यात सेवा करण्याची अमूल्य संधी मिळाली, हे विशेष.
या व्यंकटेश ग्रुपमध्ये सीमा कालिया, सोनाली उदावंत, नीता दायमा, पूनम धिमते, मीना शिंदे, मनीषा राजभोज, वैशाली खोसे, सुप्रिया सोहनी, सुनीता भगत आणि सुनिता भिटे आदी महिलांचा समावेश होता. त्यांच्या या धार्मिक आणि सेवाभावी कार्यामुळे राहुरी शहराचे नाव उंचावले आहे.