राहुरी विद्यापीठ येथील स्टेट बँकचे नवाज देशमुख यांची शिर्डी आरबीओ येथे ‘रिजनल सेक्रेटरी’ पदावर निवड

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे)०९ ऑक्टोबर २५:-

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील भारतीय स्टेट बँकेचे (SBI) शाखा प्रबंधक म्हणून कार्यरत असलेले नवाज अल्लबक्ष देशमुख यांची शिर्डी रीजनल बिझनेस ऑफिस (RBO) येथे ‘रिजनल सेक्रेटरी’ या जबाबदारीच्या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल राहुरी व परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.देशमुख हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय स्टेट बँकेत कार्यरत असून त्यांनी बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ शाखेत त्यांच्या कार्यकाळात ग्राहकाभिमुख सेवा, तत्पर प्रतिसाद आणि कार्यक्षम व्यवस्थापनामुळे शाखेचे कामकाज अधिक गतिमान झाले. त्यांनी ग्राहक समाधानाला प्राधान्य देत बँकेच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले.त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत शिर्डी आरबीओ येथे ‘रिजनल सेक्रेटरी’ पदाची जबाबदारी सोपवली आहे. या निवडीमुळे राहुरी तसेच विद्यापीठ परिसरातील ग्राहकवर्ग, कर्मचारीवर्ग आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना नवाज देशमुख म्हणाले,“भारतीय स्टेट बँकेने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पेलविण्याचा प्रयत्न करीन. ग्राहकसेवा हीच माझी प्राथमिकता राहील.” त्यांच्या या यशाबद्दल राहुरी कृषी विद्यापीठ शाखेचे अधिकारी प्रवीण रक्ताटे, प्रतीक अभंग, रामदास मामा उनवणे, चंद्रकांत साळवे (मेजर), राजेंद्र कोहकडे यांनी सत्कार करून देशमुख यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.या नियुक्तीमुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील भारतीय स्टेट बँक शाखेचा गौरव अधिक उंचावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *