राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे),०७ ऑक्टोबर २५ :- भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) उद्या, बुधवार दिनांक ०८/१०/२०२५ रोजी तहसील कार्यालयावर पायी जात तहसीलदारांना निवेदन देणार आहेत . आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलासनाना साळवे यांनी सर्व ‘भिम सैनिकांना’ या वेळी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
हे निवेदन सकाळी १० वाजता तालुकाध्यक्ष विलासनाना साळवे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून सुरू होईल. सर्व भिम सैनिक पायी चालत तहसील कार्यालयापर्यंत जातील. तेथे न्यायमूर्ती गवई यांच्यावरील या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करणारे निवेदन देण्यात येणार आहे.विलासनाना साळवे यांनी या निषेधार्थ एकत्र येऊन आपली एकता आणि या घटनेबद्दलचा तीव्र संताप व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे. सर्व भिम सैनिकांनी सकाळी १० वाजता विलास नाना साळवे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. न्यायव्यवस्थेवरील या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि न्यायमूर्ती गवई यांच्या पाठिशी उभे राहण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे.