अहिल्यानगर वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे),०७ ऑक्टोबर २५ :- आपल्या निर्भीड लेखणीतून सर्वसामान्यांच्या समस्या शासन-प्रशासनापर्यंत पोहोचवणारे आणि सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे शिर्डी येथील कर्तव्यनिष्ठ पत्रकार श्री. तुषार संजय महाजन यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव, सामाजिक कार्याप्रती असलेली बांधिलकी आणि संघटनात्मक कार्यातील तत्परता या गुणांचा विचार करून संघटनेच्या राष्ट्रीय व राज्य पदाधिकाऱ्यांनी एकमताने ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.पत्रकार तुषार महाजन यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक न्यायासाठी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी व निष्पक्ष पत्रकारितेसाठी सातत्याने कार्य केले आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांच्या समस्या त्यांनी नेहमीच अग्रभागी येऊन मांडल्या आहेत. त्यांच्या लेखणीतून झालेल्या अनेक बातम्यांमुळे प्रशासनाला जागे व्हावे लागले आणि सामान्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य घडले. या निर्भीड आणि प्रामाणिक पत्रकारितेची दखल घेत राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाने त्यांच्यावर विश्वास दाखवून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी श्री. महाजन यांच्या निवडीचे स्वागत करताना म्हटले की, “तुषार महाजन हे एक अभ्यासू, निष्ठावान आणि समाजनिष्ठ पत्रकार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील पत्रकारांचे संघटन अधिक बळकट होईल आणि संघटनेची ताकद निश्चितच वाढेल.”शिर्डीच्या भूमीतून घडलेले, सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्याने झटणारे तुषार महाजन यांच्या या निवडीमुळे जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील पत्रकारांनी त्यांच्या निवडीचे मनःपूर्वक स्वागत केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.या निवडीची घोषणा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अढांगळे, महासचिव विनोद पवार, राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार, प्रमुख सल्लागार सुभाष बिंदुवाल, राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल, आणि राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आली.तसेच, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विष्णू कंकाळ, राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकूर, राज्य कार्याध्यक्षा प्रमिलाताई अढांगळे, राज्य उपाध्यक्ष गोपालराव लाड व विनायक माळी, राज्य संघटक नरेंद्र सोनारकर, राज्य सहसंघटक शेखर सोनवणे, राज्य सचिव दत्ता मुजुमले व प्रीतमसिंग चौहान, अत्याचार निवारण समितीचे राज्याध्यक्ष दत्ता पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हंसराज बाबा वाघ आणि उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रदीप देवरे यांनी श्री. महाजन यांच्या निवडीचे मनापासून स्वागत केले.पत्रकार तुषार महाजन यांच्या निवडीबद्दल राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पत्रकार संघटन अधिक एकसंध, सक्रिय आणि प्रभावी होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.