राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे),०७ ऑक्टोबर २५: – भारतीय जैन संघटनेचे संस्थापक श्री. शांतीलालजी मुथ्था यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय जैन संघटना (अहिल्यानगर विभाग) व सुसंवाद मंच, कोल्हार भगवती यांच्या संयुक्त विद्यमाने पाथर्डी तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांना विविध ठिकाणी मदतकार्य राबविण्यात आले.
अवकाळी पावसामुळे व पूरस्थितीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, त्यांना दिलासा देण्यासाठी या संघटनांनी एकत्र येऊन ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मदत पोहोचविली
या मदतकार्या अंतर्गत खालील गावांमध्ये साहित्य वितरण करण्यात आले:
कोरडगाव: ४५ कुटुंबांना किराणा किट, ब्लॅंकेट व साड्या वाटप.
हनुमान टाकळी: ४५ कुटुंबांना किराणा किट, ब्लॅंकेट व साड्या वाटप.
करंजी: ४५ कुटुंबांना किराणा किटसोबत कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी कपडे – साड्या, शर्ट, पॅन्ट, रग, मुलांचे कपडे, स्वेटर इत्यादींचे वाटप.
कासार पिंपळगाव: १० कुटुंबांना किराणा किट, साड्या व ब्लॅंकेट वाटप.
एकूण शंभराहून अधिक कुटुंबांना अत्यावश्यक साहित्याचे वाटप करून त्यांना दिलासा देण्यात आला.
या मदत कार्यात भारतीय जैन संघटनेचे श्री. मनसुखलाल चोरडिया, श्री. संजय शिंगवी, श्री. आशिष रांका, श्री. संतोषकुमार लोढा, श्री. सचिन साखला, श्री. अमोल पटवा, श्री. विशाल कर्नावट, श्री. जितेंद्र पटवा, सौ. काव्या कर्नावट, श्री. कटारिया सर, श्री. बाळासाहेब भंडारी, श्री. प्रेमराज भंडारी, श्री. शुभम गांधी, श्री. अभय गुगळे, श्री. अभय गांधी, श्री. सतीश मुनोत, सौ. अर्चना गुगळे, श्री. निलेश गुगळे, श्री. नितीन मुथ्था, श्री. अभिषेक गुगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच करंजी येथील ग्रामपंचायत पदाधिकारी, जैन श्रावक संघाचे सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
सुसंवाद मंच, कोल्हार भगवती येथील श्री. जितेंद्र खर्डे व त्यांच्या सहकाऱ्यांनीही या सामाजिक कार्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
मानवतेचा संदेश देत “सेवेतच परमेश्वर” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या मदत कार्यामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळाला असून, स्थानिक ग्रामस्थांनी भारतीय जैन संघटनेचे व सुसंवाद मंचाचे मन:पूर्वक आभार मानले.