शिवांकुरच्या विद्यार्थ्यांनी गाजवला तालुकास्तरीय मैदान ! सात स्पर्धांमध्ये विजेतेपद

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे),०७ ऑक्टोबर २५: – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या क्रीडा भवन येथे नुकत्याच तालुकास्तरीय पावसाळी मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत राहुरी येथील शिवांकुर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

या स्पर्धांमध्ये विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारांत शिवांकुर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.
वयोगट १७ मध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये –

संस्कृती सुनील म्हसे – भालाफेक प्रथम,संस्कार पांडुरंग उंडे – भालाफेक प्रथम,भक्ती संभाजी पवार – हॅमर थ्रो (Hemarthro) प्रथम,प्रियंका सुजित होळकर – गोळाफेक प्रथम,सायली ज्ञानदेव शिरसाठ – हॅमर थ्रो द्वितीय,सौरभ शाम म्हसे – हॅमर थ्रो द्वितीय,प्रेम हिराचंद गोरे – ८० मीटर हर्डल्समध्ये तृतीय,
विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे विद्यालयाने तालुकास्तरीय पातळीवर आपली क्रीडा क्षेत्रातील भक्कम छाप उमटवली आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, उपाध्यक्ष गणेश शेळके व संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश पवार यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच विश्वस्त डॉ. गौरी पवार, डॉ. नरेंद्र इंगळे, मंगलताई पवार, शिल्पा इंगळे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन प्रोत्साहन दिले.विद्यार्थ्यांच्या या यशामागे क्रीडाशिक्षक सौरभ भांबळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, शिक्षक सचिन जाधव, किरण तारडे, भाऊसाहेब करपे, मयूर धुमाळ, विजय शिंदे, तसेच शिक्षिका ज्योती शेळके, प्रियांका पांढरे, अनिता डौले, दुर्गा बारवेकर, सोनाली कुमावत, सुजाता तारडे, सुरेखा मकासरे, शितल पाठक, अनिता म्हसे, सुनिता ढोकणे, रोहिणी हापसे, मोहिनी पेरणे आदी उपस्थित होते.तसेच शिपाई शारदा तमनर, परिवहन विभाग प्रमुख अशोक गाडे, अनिल गुंजाळ, पिनु अहिरे, भैय्या चौधरी, सखाराम बाचकर, कैलास गडदे, नंदू गिरी, नवनाथ गाडे, अविनाश तनपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या यशामुळे शिवांकुर विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकवृंदात आनंदाचे वातावरण असून विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील परंपरेत आणखी एक यशस्वी पान जोडले गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *