राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे),५ ऑक्टोबर२०२५:- संगमनेर येथे नुकत्याच पार पडलेल्या “मत चोर गद्दी छोड़” या काँग्रेस पक्षाच्या विशेष अभियान कार्यक्रमात जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा काँग्रेसचे जिल्हा कायदेशीर सल्लागार अँड. प्रकाश संसारे यांची जिल्हा काँग्रेस (अ.जा.) चे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सदर नियुक्तीपत्र माजी मंत्री व काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य मा. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अँड. प्रकाश संसारे यांना प्रदान करण्यात आले. या निमित्ताने जिल्हा काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून अनुसूचित जाती विभागाच्या संघटनात्मक बळकटीसाठी या नियुक्तीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
कार्यक्रम प्रसंगी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बंटी यादव, प्रदेश महासचिव संजय भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष अरुण गावित्रे, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ वाकचौरे, संतोष गायकवाड, सरचिटणीस रामनाथ गायकवाड तसेच इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
अँड. प्रकाश संसारे हे गेल्या २७ वर्षांपासून वकिली व्यवसायात कार्यरत असून त्यांनी अनेक गुंतागुंतीचे कायदेशीर खटले यशस्वीरीत्या हाताळले आहेत. तसेच ते नोटरी पब्लिक असून सामाजिक चळवळींमध्ये नेहमीच अग्रभागी राहिले आहेत. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे व समाजातील संपर्कामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला बहुजन समाजाचा मोठा फायदा होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
अँड. संसारे हे प्रभावी वक्ते म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळे पक्षाच्या प्रचारात त्यांचे मार्गदर्शन व सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांच्या या दुहेरी जबाबदारीमुळे – जिल्हा कायदेविषयक सल्लागार व जिल्हा (अ.जा.) उपाध्यक्ष – काँग्रेसच्या संघटन कार्याला अधिक वेग येईल, असे मत व्यक्त करण्यात आले.
सदर नियुक्तीनंतर काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले, राज्य सरचिटणीस करनदादा ससाणे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य वैभव गिरमे, बाजार समितीचे माजी अध्यक्ष अँड. भानुदास नवले, पंचायत समितीचे माजी सभापती अँड. एकनाथ खपके, राहुरी कारखान्याचे संचालक कृष्णाभाऊ मुसमाडे, अरुण ढुस, अँड. चितळकर, राहुरी वकील संघाचे अध्यक्ष अँड. ऋषिकेश मोरे, सचिव अँड. संदीप खपके, अँड. भिंगारदे, अँड. गोरक्षनाथ रसाळ, अँड. संजय वने, अँड. जी.जी. मुसमाडे, अँड.मोहनराव पवार, अँड.अप्पासाहेब पवार, अँड.राधुभाऊ मुसमाडे, अँड.भंडारी, अँड.दिवे, अँड.सी.एन. शेटे, अँड.कोबरने, अँड.कोळसे,अँड. आघाव, अँड.तांबे, अँड.घाडगे, अँड.उर्हे, अँड.तोडमल, अँड.देशमुख, अँड.सिंग, तसेच राहुरी तालुका काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब आढाव, तालुका अध्यक्ष (अ.जा.) संजय संसारे, अँड. चोरमल, अँड. पटारे, अँड. भोसले, अँड.विनायक पंडीत ,आदिनाथ कराळे, उत्तमराव कडू, कुनाल पाटील, किरण खंडागळे, अँड. तनपुरे, बाळासाहेब खांदे, (माजी सनदी अधिकारी) दत्ता कडू, तैनूर अली पठान, डॉ. विश्वास पाटील, विजय कुमावत, मयूर अढागळे, सुरेश संसारे, सुनिल हुसळे आदींसह अनेकांनी अँड. प्रकाश संसारे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
त्यांच्या या नियुक्तीमुळे काँग्रेस पक्षाच्या कायदेविषयक व सामाजिक कार्यात नवी ऊर्जा निर्माण झाली असून, जिल्हा काँग्रेसच्या पुढील वाटचालीत अँड. संसारे यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे मत पक्षातील वरिष्ठांनी व्यक्त केले.