राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे),०३ ऑक्टोबर : समाजहिताची परंपरा जपत श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ हजार रुपयांचे योगदान करण्यात आले. अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीत मदत म्हणून देवस्थानतर्फे देण्यात आलेल्या या आर्थिक सहाय्याचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.शासनाच्या वतीने हा धनादेश राहुरी येथील तहसीलदार नामदेव पाटील, नायब तहसीलदार संध्या दळवी व पोलीस निरीक्षक ठेंबे यांच्या हस्ते स्वीकारण्यात आला.या प्रसंगी देवस्थान समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील साबळे, विश्वस्त सुरसिंगराव पवार, मच्छिंद्र वामनराव कोहकडे, दत्तात्रय हरिभाऊ जगताप, अशोकराव सखाराम देशमुख, रमेश गंगाधर नालकर, सुभाष सुधाकर पाटील, सचिव बाळासाहेब मुसमाडे, सागर झावरे, पत्रकार राजेंद्र वाडेकर, रामभाऊ कवडे तसेच रुग्ण सेवक गौरव विठ्ठल तनपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान नेहमीच समाजहिताच्या कार्यात पुढाकार घेत आले आहे. धार्मिक कार्यासोबतच सामाजिक उपक्रमांतून जनतेच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे करणाऱ्या या देवस्थानाच्या योगदानाची नोंद समाजामध्ये आदर्श म्हणून घेतली जात आहे.