राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे),०३ ऑक्टोबर :श्री शिवाजी विद्यानिकेतन, श्री शिवाजीनगर या राहुरी पब्लिक स्कूल नावाने परिचित “आपली शाळा “च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवार दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता राहुरी फॅक्टरी येथील आपल्या शाळेत होणार असून राहुरी पब्लिक स्कूल च्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नवनीत दरक,मनोज उंडे, सुभाष (छबुराव )तनपुरे व गोरक्षनाथ शेटे यांनी केले आहे.
आपली शाळा एक आठवण म्हणून यापुढे राहणार आहे आणि म्हणून त्याची स्मृती आपल्याला नेहमीच आठवणीत राहावी म्हणून खरे तर आपण सर्वांनी मिळून हा कार्यक्रम प्रत्येकाच्या मनातून ठरवला आणि १२ ऑक्टोबर २०२५ रोजी साकार देखील होणार आहे.
यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नवनीत दरक म्हणाले की हा उपक्रम कुणा एका वर्गाचा नसून तर संपूर्ण शाळेचा आहे.”आपली शाळा “एक आठवण म्हणून यापुढे राहणार आहे आणि म्हणून त्याची स्मृती आपल्याला नेहमीच आठवणीत राहावी म्हणून खरे तर आपण सर्वांनी मिळून हा कार्यक्रम प्रत्येकाच्या मनातून ठरवला आणि १२ ऑक्टोबर २०२५ रोजी साकार देखील होणार आहे.
* त्यामुळे माझा वर्ग हा भेद आपण कोणीही बाळगू नये. या आपल्या शाळेची स्थापना १९७३साली झाली. या शाळेतून शिक्षण घेऊन गेलेले अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करीत आहेत नव्हे तर राजकीय सामाजिक शैक्षणिक प्रशासकीय पातळीवर मोठ्या पदावर कार्य करीत असताना निश्चितच त्यांना या आपल्या अभिमान निश्चितच आहे.पण आपण ज्या शाळेत शिकलो वाढलो मोठे झालो ती शाळा आज अस्तित्वात नाही आपली शाळा २०१३ साली बंद पडली असून या आपल्या मौल्यवान वास्तूचा अंत झाला,आणि या ४० वर्षात या शाळेने आपल्याला दिलेले असंख्य बहुमूल्य संस्कार,मार्गदर्शन दिले असून ते कधी ही न विसरण्यासारखे आहेत.महाराष्ट्रात नावलौकिक असलेली आपली शाळा एक आठवण म्हणून यापुढे राहणार आहे आणि म्हणून त्याची स्मृती आपल्याला नेहमीच आठवणीत राहावी म्हणून खरे तर आपण सर्व जुन्या सहकाऱ्यांनी या मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन माजी विद्यार्थी संघटनेने केले आहे.