राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे)० ऑक्टोबर :
राहुरी शहराच्या व्यावसायिक विकासात आणखी एक महत्त्वाची भर पडत असून, शहरातील ग्राहकांसाठी आधुनिक सुविधा व व्यापक वस्तूंच्या श्रेणीसह सुसज्ज असलेले ‘बालाजी हार्डवेअर आणि प्लायवुड’ या नव्या भव्य शोरूमचे उदघाटन गुरुवार, दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर सकाळी ११ वाजता वायएमसी ग्राउंड, नगर-मनमाड रोड येथे होणार आहे.
या शोरूममध्ये घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या हार्डवेअर, प्लायवुड, फर्निचर मटेरियल, दरवाजे, खिडक्या, फिटिंग्ज, तसेच आकर्षक डिझाईन्समधील नवीनतम वस्तू सहज उपलब्ध होणार आहेत. यामुळे राहुरी तालुक्यातील बांधकाम क्षेत्राशी निगडित आर्किटेक्ट, इंजिनीयर, कॉन्ट्रॅक्टर व कारपेंटर बांधवांसाठी हे शोरूम एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.
उदघाटन समारंभाचे शुभहस्ते माजी राज्यमंत्री मा. श्री. प्राजक्तदादा तनपुरे यांच्या हस्ते होणार असून, या प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख मान्यवरांमध्ये मा. श्री. अरुण साहेब तनपुरे (चेअरमन, डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे साखर कारखाना), मा. डॉ. उषाताई तनपुरे (माजी नगराध्यक्षा, राहुरी नगरपरिषद), मा. श्री. हर्षदादा तनपुरे (संचालक, डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे साखर कारखाना), मा. श्री. ताराचंदजी तनपुरे (माजी नगराध्यक्ष, राहुरी), तसेच मा. डॉ. धनंजयजी पानसंबळ (संचालक, लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, राहुरी) यांचा समावेश आहे.
यावेळी परिसरातील सर्व आर्किटेक्ट, इंजिनीयर, कॉन्ट्रॅक्टर, कारपेंटर बांधवांसह राहुरी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे सह्याद्री बेकर्स परिवाराने आवाहन केले आहे.