राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे)० ऑक्टोबर : प्रेरणा पतसंस्थेची नववी शाखा देवळालीप्रवरात उद्या विजयादशमीच्या मुर्हूतावर सुरू होत आहे. शाखेचा उद्घाटन सोहळा उद्या गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता शांती काँम्प्लेक्स, देवळालीप्रवरा येथे होणार असल्याची माहिती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे पाटील यांनी दिली.
प्रेरणा पतसंस्थेच्या या शाखेचा शुभारंभ माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांच्या हस्ते होणार आहे. माजी आमदार चंद्रशेखर कदम यांची प्रमुख उपस्थिती आहे.प्रेरणा पतसंस्थेच्या ठेवी 125कोटी 51लाखरुपये असून कर्ज वितरण 80कोटी रुपये झाले आहे .32 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या पतसंस्थेचे वीस वर्षांपूर्वी संगणकीकरण झालेले आहे .कोअर बँकिंग ते सर्व बँकिंग सुविधा येथेही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत .संस्थेचे मोबाईल ॲप देखील आहे. या सर्व बँकींग सुविधा देवळालीप्रवरा सारख्या बाजारपेठेत ग्राहकांना उपलब्ध होत आहेत.ग्राहकांची अनेक वर्षांची अडचण आता दूर होणार असल्याचे सुरेश वाबळे यांनी सांगितले. संस्थेच्या या आधी गुहा ,म्हैसगांव, तांभेरे ,राहुरी ,आंबी व श्रीरामपूर येथे शाखा आहेत.वांबोरी नंतर लगेचच ब्राह्मणी शाखा सुरु झाली असून देवळालीप्रवरा येथे आज विजयादशमी च्या मुर्हूतावर नवीन शाखा कार्यान्वित होत आहे असे व्हा . चेअरमन मच्छिंद्र हुरुळे यांनी सांगितले.संचालक मंडळाने या आर्थिक वर्षात तालुक्यात तीन शाखा नव्याने सुरू करण्याचा संकल्प केला होता.त्याची पूर्तता आज होत असल्याचे उपाध्यक्ष हुरुळे यांनी सांगितले.