राहुरी वेब प्रतिनिधी, (शरद पाचारणे)२७ – राहुरी येथील खळवाडी परिसरातील अंबिकानगर येथे जय अंबिका मित्र मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध कीर्तनकार, रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनाचे तसेच भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे मार्गदर्शक शांताराम (बापू) गाडेकर यांनी दिली.
राहुरी शहरातील स्टेशन रोड येथील अंबिका नगर येथे गेल्या 44 वर्षांपासून नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो यावर्षी देखील नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेच्या दिवशी राहुरी नगरपालिकेचे कर्मचारी राजेंद्र पवार यांच्या हस्ते पायी ज्योतीचे स्वागत करण्यात आले. राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. दैनंदिन आरती व महाप्रसादाचे आयोजन सुरू असून मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.00 ते 7.00 या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार तसेच रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांच्या जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर भव्य महाप्रसाद भंडाऱ्याने या नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे. राहुरी शहर तसेच तालुक्यातील भाविकांनी या नवरात्र उत्सव सोहळ्यात सहभागी होऊन कीर्तन व महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे मार्गदर्शक शांताराम (बापू) गाडेकर यांच्यासह सर्व सदस्य व नागरिकांनी केले आहे.