लैंगिक अत्याचार उघडकीस आणत खुनाचाही गुन्हा सोडवणाऱ्या राहुरी पोलिसांचा स्नेहालयातर्फे गौरव

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ) २६ :अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराचा गुन्हा उघडकीस आणून, तपासादरम्यान खुनाचा गुन्हा प्रकाशात आणणाऱ्या राहुरी पोलिस पथकाचा स्नेहालय संस्थेतर्फे मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

स्नेहालयाच्या पूजा दहातोंडे यांनी राहुरी पोलिस ठाण्याला दिलेल्या माहितीवरून राहुरी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दवणगाव येथे धाड टाकली. यावेळी तीन अल्पवयीन पीडित मुली सापडल्या. त्यांच्या जबाबांवरून आरोपी बजरंग कारभारी साळुंके व शितल बजरंग साळुंके यांना अटक करण्यात आली. पुढील तपासात या आरोपी दांपत्याने निलेश जगन्नाथ सारंगधर या व्यक्तीचा खून करून प्रेत ठेवल्याचेही उघड झाले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्नेहालय उडान प्रकल्प (अहिल्यानगर) तर्फे श्री. हनीफ शेख, अॅड. बागेश्री जरंडीकर मानक, श्री. प्रवीण कदम, श्री. शाहिद शेख, कु. पूजा दहातोंडे, श्री. विनायक महाले तसेच सरपंच सौ. प्रयागाताई लोंढे, शारदा ब्राह्मणे व आशा आढाव (अंगणवाडी सेविका शेंडी) यांच्या हस्ते पोलिस पथकाचा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जयदत्त भवर यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.

या प्रसंगी पथकातील पोउपनी. राजू जाधव, पोहेकॉ. सुरज गायकवाड, राहुल यादव, शकूर सय्यद, पोकॉ. गणेश लिपणे, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, नदीम शेख, मपोकॉ. वंदना पवार, मीना नाचन यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *