राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ) २६ :
राहुरी तालुका खरेदी विक्री संघास चालू आर्थिक वर्षात २०लाख रुपयाचा नफा झाला असून संस्थेस चालू आर्थिक वर्षात” अ ” ऑडिट वर्ग मिळाला आहे.संस्थेकडे आज १कोटी१८रुपयाच्या ठेवी असून संस्था उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिने रस्त्यालगत जमीन घेऊन तिथे व्यापारी संकुल उभारणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन युवराज सुधाकर तनपुरे यांनी ७० व्या वार्षिक सर्व साधारण सभेत बोलत होते. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक व राज्य मार्केटिंग फेडरेशनचे माजी संचालक सुधाकर बाबुराव तनपुरे, व्हॉइस चेअरमन संतोष खाडे, जेष्ठ संचालक विष्णू तारडे, दत्तात्रय गडाख,सखाराम कुमकर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना संस्थेचे चेअरमन युवराज तनपुरे म्हणाले की
१९५५ साली स्व. डॉ बाबुराव दादा यांनी स्थापन केलेल्या संस्थेची अमृत महोत्सवी वर्षकडे वाटचाल सुरु झाली आहे. शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या या संस्थेची शेतकऱ्यांशी नाळ जुळली असून संस्था ही मार्गदर्शक सुधाकर तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर आहे. संस्थेने मागील वर्षी संस्थेच्याच जागेवर बांधलेल्या व्यापारी संकुलामुळे संस्थेस अनामत रक्कम घेऊन ३कोटी रुपये प्राप्त झाले. सर्व गाळे भाडेतत्वावर देण्यात आले असून तीन मजली इमारत आहे. यातून खर्च वजा जाता संस्थेस एक कोटी विस लाख रुपये उत्पन्न मिळाले. आता फेज २काम सुरु झाले असून तिथेही भाडेतत्वावर गाळे अनामत रक्कम घेऊन देण्यात येणार आहे.संस्थेचे उदिष्ट हे जास्तीत जास्त उत्पन्न वाढविणे हे आहे. या बरोबर च राहुरी येथील बाजार समितीच्या आवारातील जागेचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. गेली १० वर्ष मार्गदर्शक सुधाकर तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नातून फेडरेशन व नाफेड च्या माध्यमातून जी शेतमालाची खरेदी सुरु आहे त्यात संस्थेने चालू वर्षी ७१६० क्विंटल सोयाबीन खरेदी करून ३ कोटी ५० लाख रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली. त्यातून संस्थेस ६.५०लाख रुपये नफा झाला. व एकूण संस्थेस इतर बाबीतून मिळून २०लाख५५हजार रुपये नफा झाला. संस्थेत संचालक सभासद व कर्मचारी यांच्या समन्व्यातून भरभराट झाल्याचे सांगितले.
यावेळी संस्थेचे सचिव बाळासाहेब फुलसौंदर यांनी अहवाल वाचन केले.
तर प्रास्ताविक संस्थेचे जेष्ठ संचालक अप्पासाहेब कोहकडे यांनी करताना संस्थेकडून १० वर्षपूर्वी खते व अन्य वस्तू खरेदी केल्या पण विविध अडचणी मुळे ती रक्कम भरू न शकणाऱ्या सभासदांची थकीत रक्कम निर्लेखीत करण्याचा निर्णय संस्थेने सभेची मंजुरी घेऊन घेतला आहे. संस्थेकडे असलेल्या ठेवीच्या रक्कमेतून एक कोटी पर्यंत जमीन खरेदी करून त्यावर विविध व्यवसाय सुरु करण्याचा मानस असून त्यातून संस्थेचे उत्पन्न वाढविणे हा उद्देश आहे. ३१/३/२०२५अखेर संस्था नफ्यात असून संस्थेची भरभराट सुरु झाली आहे.१०वर्षात संस्थेचे मार्गदर्शक सुधाकर तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय जी कामे मिळाली त्यात चांगले काम केल्याबद्दल संस्थेस शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. डॉ दादासाहेब तनपुरे यांनी स्थापन केलेल्या व संस्थेचे मार्गदर्शक सुधाकर तनपुरे यांच्या मार्गदर्शना खालील कार्यरत असलेल्या खरेदी विक्री संघ तालुका मुद्रणालय, ट्रॅक ट्रान्सपोर्ट, तालुका मध्यवर्ती ग्राहक भांडार या सर्व संस्था नफ्यात आहे.
यावेळी संस्थेचे संचालक संतोष पानसंबळ,आबासाहेब वाघमारे, ज्ञानदेव हारदे, बाळकृष्ण पवार, संतोष तनपुरे, बाबासाहेब शिंदे, सौ सुनीता लहारे, सौ शोभा डुक्रे, अनिल शिंदे, सौ पुष्पा शेळके,आबासाहेब शेटे, विलास शिरसाठ,भोमा शिंदे,खाडे सर विजय माळवदे, ज्ञानदेव नालकर, विट्टल लांबे बाबासाहेब तनपुरे, कोंडीराम वडितके,कांतीराम वराळे,अरुण तनपुरे, स्वप्नील कडू शुभम काळे, युसूफ अत्तार आदि उपस्थित होते.