श्रीरामपूर वेब टिम (ता. श्रीरामपूर) – श्रीरामपूर पोलिसांनी अवैध शस्त्रविक्री करणाऱ्या दोन आरोपींना सापळा रचून पकडले असून त्यांच्या ताब्यातून तीन गावठी पिस्तूल, दहा जिवंत काडतुसे, सहा मॅगझिन, दोन मोबाईल फोन व ईरटीका कार असा मिळून ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई बुधवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी संजय नगर रोड, मिल्लत नगर येथे करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही धाडसी मोहीम राबविण्यात आली.
पोलिसांनी पकडलेले आरोपी असे –
बबलू उर्फ इम्तियाज अजित शहा (३५, रा. बाबपुरा चौक, श्रीरामपूर)
नदीमखान शाबीर खान (३०, रा. चाळीसगाव, जि. जळगाव)
ईरटीका (एमएच १२ एसडी ७३३८) कारच्या डॅशबोर्ड व मागील सीटमध्ये लपवलेले शस्त्रसाठा पोलिसांना मिळून आला.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सतीश पठारे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम करीत आहेत.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी चिंताजनक असून,
इम्तियाज शहा याच्यावर श्रीरामपूर, राहुरी, पुणे येथे अनेक गुन्हे दाखल आहेत.
नदीम खान याच्यावर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तब्बल नऊ गुन्हे नोंद आहेत.
सदरची कारवाई ही मा.श्री.सोमनाथ घार्गे सारे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, तसेच श्री. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर यांचे मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. रविंद्र चव्हाण, पो.हे. कॉ. सचिन धनाड, पो.हे.कॉ. संतोष दरेकर, पो.ना. काका मोरे, पो.ना. अनिल शेंगाळे, पो.ना. रामेश्वर वेताळ, पो.कॉ. सतिष पठारे, पो.कॉ. नितीन शेलार (पो.मुख्या.), पो.कॉ. अजय अंधारे (पो.मुख्या.), आर.सी.पी. पथकातील पो.कॉ. सचिन शेळके, पो.कॉ. गायके, पो.कॉ. भोई, पो.कॉ. आहिरे व श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. गणेश जाधव, पो.स.ई. दादाभाई मगरे, पो.स.ई. रोशन निकम, पो.कॉ. संपत बडे असे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.