राहुरी येथील पत्रकार प्रसाद मैड यांना सुवर्ण भरारी संस्थेचा पुरस्कार जाहीर

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे),२५ सप्टेंबर :

राहुरी येथील पत्रकार प्रसाद मैड यांना सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे .

 गेल्या 32 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे राहुरी येथील प्रसाद भगवान मैड यांची कारकीर्द मुळातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झालेली आहे . विविध जिल्हास्तर व राज्यस्तरीय वृत्तपत्रातून त्यांना पत्रकारितेचा अनुभव आहे . सामाजिक क्षेत्रासह पर्यावरण विज्ञान समाजमनाला भिडणाऱ्या समस्यांचे त्यांनी परखड लिखाण केले आहे . सतर्क खबरबात जिल्ह्याची या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सध्या पत्रकारितेत विविधांगी प्रश्नांवर त्यांचा भर आहे .

त्यांचा ह्या कार्याची दखल घेता, सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा वतीने नुकताच त्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार हा पुरस्कार जाहीर झाला आहे. लवकरच या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थित मध्ये होणार आहे .

या बद्दल अनेक समाज बांधव व इतर समाजातुन तसेच मित्र परिवार यांनी प्रसाद मैड यांचे कौतुक करत अभिनंदन केले

तसेच सुवर्ण भरारी संस्थेचा संस्थापक अध्यक्षा सारीका ताई नागरे, व प्रसिद्धी प्रमुख रवि माळवे , अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे राहता तालुका प्रसिद्धीप्रमुख शंकर सोनवणे सदस्य- सोमनाथ आहेर, श्रीपाद बोकंद, यांनी फोन करून प्रसाद मैड यांना शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *