राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ),२२ सप्टेंबर :
मोमीन आखाडा येथील ग्रामस्थांनी गावातील वाढत्या चोरीच्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त करत पोलीस निरिक्षक संजय ठेंगे यांच्या कडे निवेदन देत
कारवाईची मागणी केली. मागील सहा महिन्यांपासून गावातील चोरीच्या घटना लक्षणीयरीत्या वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील ग्रामपंचायतमार्फत बसवलेले सूर्य दिवे चोरीस गेले आहेत. त्याचप्रमाणे श्मशानभूमीतील शवांची योग्य देखभाल होत नसल्याची तक्रार करण्यात आली असून, मुस्लिम दफनभूमीतील बोरवरील मोटरचे केबलही चोरीला गेले आहेत. या घटनांमुळे गावातील शांततेवर परिणाम होत असून सामाजिक असंतुलन निर्माण होण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिक अत्यंत अस्वस्थ असून काही लोक आंदोलन उभारण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तात्काळ कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी व नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळवून देण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.या निवेदनावर शिंदे रावसाहेब भानुदास, कदम मच्छिंद्र चंद्रभान ,कदम दत्तात्रय, शेख वसीम अबुभाई, शरफुद्दीन उस्मान पठाण, दत्तात्रय महादू कदम, अनिल सोपानराव कदम,शेख शब्बीरभाई बाबूलाल, शेख जैनुद्दीन गुलाब भाई, शेख याकूब चंदुलाला, शेख आरिफ भिकन भाई ,शिंदे सुरेश नारायण, शेख रहीमसाहेब गुलाबभाई, शेख इन्तेहाज शेखलाल, शेख युनूस मुनीर, सोमनाथ कोहकडे आदींच्या सह्या आहेत.