राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ),२२ सप्टेंबर :
प्रेरणा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, गुहा यांची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दि. २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता हनुमान मंदिर, गुहा येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेला मा. खासदार श्री. प्रसाद तनपुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, संस्थेचे चेअरमन श्री. सुरेश गोरक्षनाथ वाबळे अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती संस्थेचे जनरल मॅनेजर गोरक्षनाथ मोहन चंद्रे यांनी दिली.
सभेमध्ये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रके वाचून मंजुरीस ठेवण्यात येणार असून नफा वाटप, ऑडिट मेमो, अंदाजपत्रक, संचालक व नातेवाईकांकडील कर्जाची माहिती, लेखापरीक्षक नेमणूक यांसह विविध विषयांवर विचारविनिमय होणार आहे. तसेच वांबोरी, ब्राम्हणी व देवळाली प्रवरा शाखांसाठी झालेले खर्च, देवळाली प्रवरा शाखेसाठी स्वमालकीची जागा खरेदी, उपविधी दुरुस्ती आदी महत्त्वाचे विषय सभेपुढे मांडले जाणार आहेत.
सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहून सभेतील कामकाजात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन व्हा. चेअरमन श्री. मच्छिद्र सोपान हुरुळे यांनी केले आहे.