राहुरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई : आठवडे बाजारातील मोटरसायकल चोरी २४ तासांत उघडकीस

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ),२२ सप्टेंबर : राहुरी येथील आठवडे बाजारातून चोरलेली मोटरसायकल केवळ २४ तासांत शोधून काढत राहुरी पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे. या कारवाईदरम्यान चोरीस गेलेली मोटरसायकलही हस्तगत करण्यात आली असून, आणखी काही चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गुरुवार दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी राहुरी आठवडे बाजारातून मोटरसायकल चोरी झाल्याची फिर्याद शैलेश पांडुरंग शेटे, रा. गोटुंबे आखाडा, ता. राहुरी यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार गुन्हा रजिस्टर नं. १०६९/२०२५, भा.दं.वि. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरीप्रकरणी तपास सुरू असताना सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदाऱ्यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी विशाल मच्छिंद्र थोरात (वय ३५, रा. गोंडेगाव, ता. श्रीरामपूर) यास ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी दि. २० सप्टेंबर रोजी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या दरम्यान चोरीस गेलेली मोटरसायकल आरोपीकडून जप्त करण्यात आली आहे.

या संपूर्ण कारवाईस मा. श्री. सोमनाथ घार्गे, सो. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा. श्री. सोमनाथ वाकचौरे, सो. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर तसेच श्री. डॉ. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग यांचे मार्गदर्शन लाभले. ही कारवाई पो.नि. संजय आर. ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नवले, संदीप ठाणगे व पोलीस कॉन्स्टेबल जयदीप बडे राहुरी पोलिस स्टेशन यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *