प्रेरणा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, गुहा यांची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २५ सप्टेंबर रोजी

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ),२२ सप्टेंबर :
राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित गुहा, ता. राहुरी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

ही सभा हनुमान मंदिर, गुहा येथे होणार असून संस्थेचे चेअरमन श्री. मच्छिंद्र सोपान हुरुळे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा बँकेचे संचालक मा. प्राजक्त तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

सभेमध्ये खालील महत्त्वाचे विषय चर्चेस येणार आहेत :

मागील सभेच्या कार्यवाहीचे वाचन व मंजुरी.

वार्षिक अहवाल सादर करणे.

सन २०२४-२५ या वर्षाचे ताळेबंद व आर्थिक अहवाल सादर करून मंजुरी.

सन २०२५-२६ या वर्षासाठी नियोजन मंजुरी.

कर्ज वितरण, कर्ज वसुली व आर्थिक व्यवहारांबाबत निर्णय.

कर्मचारी मानधन, लाभांश व शिल्लक निधीबाबत चर्चा.

संस्था नियमावलीनुसार आवश्यक ठराव पारित करणे.

 सर्व सभासदांनी नियोजित दिवशी उपस्थित राहून सभेतील विषयांवर आपले मौल्यवान मार्गदर्शन द्यावे, असे आवाहन संस्थेचे जनरल मॅनेजर गोरेश्वर मोहन चंद्रे यांनी केले आहे.
सभासदांनी सभा दिवसापूर्वी कोणत्याही प्रकारचे प्रश्न संस्था कार्यालयात लेखी स्वरूपात सादर करावेत. सभेच्या दिवशी नवीन प्रश्न उपस्थित करता येणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *