राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे)१४ सप्टेंबर : राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरातील मुळा नदीपात्रातून अवैध वाळू उपशावर राहुरी पोलिसांनी कारवाई करत तब्बल ३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राहुरी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पोलिसांनी नदीपात्रावर छापा टाकला. यावेळी अज्ञात वाळू तस्करांनी उपसा केलेली ३० ब्रास वाळू (किंमत अंदाजे ३ लाख रुपये) तसेच ४५ हजार रुपयांचा चप्पू असा एकूण ३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त केलेला मुद्देमाल माननीय तहसीलदार नामदेव पाटील यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी मौजे बारागाव नांदूर श्रीमती मरकड मॅडम यांच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी देण्यात आला आहे.
ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे , अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पो हे का विकास वैराळ, पोलीस नाईक गणेश सानप, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास गीते व सागर नवले यांनी सहभाग घेतला.