राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ), ९ सप्टेंबर : तत्कालीन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे युवक जिल्हाध्यक्ष दिवंगत बंटीभाई बिवाल यांनी स्थापन केलेल्या “आदिशक्ती नवरात्र उत्सव मंडळा” ची २०२५ च्या नवरात्रोत्सवासाठी नवीन पदाधिकारी निवड नुकतीच जाहीर झाली आहे. दिवंगत बंटीभाई बिवाल यांचे चिरंजीव यश बिवाल,पापाभाई बिवाल, आणि निखिल भैया बिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड सर्वानुमते आणि बिनविरोध पार पडली.
सोमवार, ८ सप्टेंबर २०२५ रोजी “आदिशक्ती नवरात्र उत्सव मंडळ” आणि “दिवंगत बंटीभाई बिवाल मित्र मंडळा”चे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी एकमताने नवीन कार्यकारिणीची निवड केली. यानुसार, सुरेश उबदे यांची अध्यक्षपदी, तर यश सरोदे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. मंडळाच्या खजिनदारपदाची जबाबदारी आयान शेख यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर ओम लाहारे आणि गुडू तांबोळी उपखजिनदार म्हणून काम पाहतील. त्याचप्रमाणे, सुजल साळवे आणि अविनाश डोगरे यांची कार्याध्यक्षपदी, तर भैया अडागळे आणि लला शेख यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी यश भैय्या बिवाल यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “दिवंगत बंटी भैया बिवाल यांनी स्थापन केलेल्या “आदिशक्ती नवरात्र उत्सव मंडळा”चा वारसा आम्ही जपत राहू. त्यांची सेवा, विचार आणि कार्यपद्धती आमच्या कामातून सतत जाणवेल, आणि त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने आम्ही हे कार्य पुढे नेणार आहोत.”अशी ग्वाही त्यांनी दिली.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष तानसेन बिवाल यांनी सर्वांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या निवडीच्या वेळी गुलशन बिवाल, सचिन जगधने, रोहित बिवाल, गणेश भाटिया, शुभम बिवाल, अरमान शेख, करण बुबक, युवराज चौधरी, गौरव पवार, रेहान शेख, साहिल बिवाल, सोनू बिवाल, राकेश पवार, करण हिरे, दक्ष बिवाल,शंकर ससाने, सुमित जगधने यांच्यासह मंडळाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला असून मंडळाकडून येणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी भव्य आयोजनाचे संकेत देण्यात आले आहेत.