राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ),५सप्टेंबर: येथील मुस्लिम समाजाने यंदाही ईद-ए-मिलादचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. गावातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येत पैगंबर मुहम्मद यांचा जन्मदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला.
यावेळी सकाळी नऊ वाजता गावातील मुख्य रस्त्यांवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच, संध्याकाळी पाच ते नऊ या वेळेत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कुराण पठण स्पर्धा, धार्मिक प्रवचने आणि मौलानांचे मार्गदर्शन यांचा समावेश होता. गावातील लहान मुलामुलींनी देखील कुराण पठणात सहभाग घेतला.
गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही ईद-ए-मिलाद शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी गावातील मुस्लिम युवक आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांनी केलेल्या नियोजनामुळे जेवणासह सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडले. संपूर्ण मुस्लिम समाजाने या यशस्वी आयोजनाबद्दल युवकांचे आभार मानले.