राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ),५सप्टेंबर:अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने रविवार, ७ सप्टेंबर रोजी चार तालुक्यांमध्ये तालुकास्तरीय बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर, राहाता, राहुरी, आणि नेवासा येथे या बैठका होणार आहेत. समता परिषदेच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी आणि ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकांमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच, गावपातळीपर्यंत परिषदेच्या शाखा सुरू करण्याच्या नियोजनावरही चर्चा होणार आहे.
या बैठकांमध्ये समता परिषदेचे प्रदेश प्रचारक प्रा. संतोष वीरकर, माजी आमदार पांडुरंग अभंग, प्रदेश कार्यकारिणी सदस्य पद्मकांत कुदळे, विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, आणि जिल्हा कार्याध्यक्ष अंकुशराव ताजणे यांसारखे प्रमुख नेते मार्गदर्शन करतील.
हि बैठक सकाळी ८:३० वाजता: श्रीरामपूर शहरातील माळी बोर्डिंग
सकाळी ११:०० वाजता: राहाता येथील संत सांवता महाराज मंदिर
दुपारी २:०० वाजता: राहुरी येथील ज्येष्ठ नागरिक हॉल
दुपारी ४:०० वाजता: नेवासा , साई श्रद्धा लॉन्स ! कुकाणा .
या बैठकांना स्थानिक ओबीसी बांधव आणि समता सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाऊसाहेब मंडलिक, सुभाषराव गायकवाड, बाळासाहेब ताजणे, रावसाहेब जावळे, भाऊसाहेब बिडवे, दादासाहेब मेहेत्रे, धनंजय गाडेकर, एकनाथ नागले, आणि प्रकाश कुर्हे यांनी केले आहे.