मुंबई-शिर्डी साई फास्ट पॅसेंजरचे राहुरी रेल्वे स्टेशन येथे जोरदार स्वागत

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे)- राहुरी रेल्वे स्टेशन येथे नव्याने थांबा मिळालेल्या मुंबई-शिर्डी साई फास्ट पॅसेंजर या रेल्वे गाडीचे ग्रामस्थांच्या वतीने रेल्वेचे चालक, वरिष्ठ अधिकारी व रेल्वे स्टेशन व्यवस्थापक यांचा सन्मान करून जोरदार स्वागत करण्यात आले.

          राहुरी रेल्वे स्टेशन येथे एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांना थांबा मिळावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. अनेक गाड्यांच्या थांब्याची मागणी असताना राहुरी रेल्वे स्टेशन येथे दि.3 सप्टेंबर पासून शिर्डी मुंबई साई फास्ट पॅसेंजर या रेल्वे गाडीला थांबा मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. आज दि.4 सप्टेंबर रोजी सकाळी 7.00 वाजता मुंबई शिर्डी साई फास्ट पॅसेंजर ही रेल्वे गाडी राहुरी रेल्वे स्टेशन येथे दाखल झाली. यावेळी भल्या पहाटेपासूनच ग्रामस्थांनी या ठिकाणी थांबून या रेल्वे गाडीचे जोरदार स्वागत केले. साईबाबांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या. रेल्वेचे पुणे विभागाचे सीनियर डीएमई, रेल्वे चालक श्रीकांत दीक्षित, रेल्वे स्टेशन व्यवस्थापक सचिन शर्मा, रेल्वे स्टेशन प्रबंधक प्रमोद खाडे यांचा ग्रामस्थांनी सत्कार करून आभार व्यक्त केले.

         याप्रसंगी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अशोक काळे, भाजपाचे तालुका मंडल अध्यक्ष धनंजय आढाव, जिल्हा चिटणीस रवींद्र म्हसे, रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष इंद्रभान पेरणे, सचिव मंगल जैन, ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब पेरणे, ग्रा.पं.सदस्य निसारभाई सय्यद, शिवाजी खडके, आबासाहेब पेरणे, लक्ष्मण पेरणे, रावसाहेब खडके, मुख्याध्यापक सर्जेराव पेरणे, माजी उपसरपंच रामराव पेरणे, विठ्ठल धागुडे, माजी चेअरमन सुखदेव खाटेकर, कानिफनाथ धसाळ, सेवा संस्थेचे सदस्य अविनाश पेरणे, प्रसाद पेरणे, प्रमोद खडके, उत्तम बनसोडे, संतोष पवार, आप्पा लोखंडे, रमेश लोखंडे, कांतीलाल डुक्रे,  बाळासाहेब कदम, दीपक बलसाने, बादल शिंदे, चरण धागुडे, सतीश चितळकर, सोपान निकम, एजाज पठाण, अनिल गायकवाड, राम चेखलिया, पत्रकार विनीत धसाळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. रविवार, बुधवार, गुरुवार व शुक्रवार आठवड्यातील हे चार दिवस सदर गाडी प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध राहणार असून गाडीला थांबा मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वच नेत्यांचे, रेल्वे सल्लागार समितीचे सर्व सदस्य, रेल्वे प्रवासी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *