राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे): मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला यश मिळाल्याने, राहुरी शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. मंगळवार, २ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता शनी चौकात जमून कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
यावेळी राहुरी शहरातील शनी मंदिरात सर्व मराठा बांधवांनी एकत्र येत शनीदेवाची पूजा केली. त्यानंतर फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. संपूर्ण मराठा समाजात आनंदाचे वातावरण पसरले होते.
या आनंदोत्सवात कांता तनपुरे, रवींद्र मोरे, ॲड. राहुल शेटे, अक्षय तनपुरे, सचिन बोरुडे, राजेंद्र लबडे, विक्रम गाढे, विक्रम मोढे, विनायक भाटे, मधुकर घाडगे, रवींद्र तनपुरे, मयूर कल्हापुरे, भैय्या कल्हापुरे, भैय्या म्हस्के, वांढेकर मेजर, मदन तनपुरे यांच्यासह अनेक मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.