राहुरी येथे उद्या मराठा समाजाचा रास्ता रोको

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे )०१ऑगस्ट : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात, या मागणीसाठी राहुरीतील सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवार, २ सप्टेंबर २०२५ रोजी नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन राहुरीच्या नायब तहसीलदार संध्या दळवी यांना देण्यात आले आहे.

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि आरक्षणाची मागणी रेटण्यासाठी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सकाळी १०:३० वाजता बाजार समितीसमोर एकत्र येणार आहेत. यावेळी रास्ता रोको आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

निवेदन देताना रवींद्र मोरे, राजूभाऊ शेटे, लक्ष्मीकांत तनपुरे, ॲडव्होकेट राहुल शेटे, ॲडव्होकेट एस.एन. तोडमल, ॲडव्होकेट सुरेश तोडमल, सचिन म्हसे, बाळासाहेब शिंदे, विक्रम गाडे, मयूर कल्हापूरे, राजेंद्र नालकर, मधुकर घाडगे, सचिन करपे, उमेश कवाने यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *