राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे) २५ ऑगस्ट: राहुरी तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात विद्यार्थ्यांनी यश मिळवत आपल्या शाळेचा गौरव वाढवला.
या स्पर्धेत, सहावीतील आयुष बनकरने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळवले. तर सातवीतील यश गवतेने द्वितीय क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे, सहावीतील आरोही थोरात आणि कृतिका नवले यांनीही द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या यशाबद्दल शाळेचे आणि पालकांचे अभिनंदन केले जात आहे.
२८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी आयुषची निवड
या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे, सहावीतील विद्यार्थी आयुष बनकरची निवड २८ ऑगस्ट रोजी वाडिया पार्क, अहमदनगर येथे होणाऱ्या पुढील स्तरावरील स्पर्धेसाठी झाली आहे. त्याच्या या निवडीमुळे शाळेत आनंदाचे वातावरण आहे.
सर्व यशस्वी खेळाडूंचे त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!