राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे) : राहुरी येथील विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टच्या औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. कल्पेश चंद्रकांत राका यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवी मिळाली आहे. ही पदवी त्यांना इंदोरच्या ओरिएंटल युनिव्हर्सिटीने फार्मसी विषयात दिली आहे.
डॉ. राका यांनी “डेव्हलपमेंट अँड वॉलिडेशन ऑफ यूवी अँड एच पी एल सी मेथॉड्स फॉर डिटरमिनेशन ऑफ हायपोग्लासेमिक कॉम्बिनेशन एन बल्क अँड टॅब्लेट्स” या विषयावर संशोधन केले आणि आपला प्रबंध सादर केला. त्यांच्या या यशस्वी वाटचालीमध्ये भोपाळ येथील आय.ई.एस. फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. कविता लोक्ष यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या यशाबद्दल विवेकानंद नर्सिंग होमचे अध्यक्ष अरुण साहेब तनपुरे, सर्व संचालक, तसेच विवेकानंद फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय नागरगोजे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.