राहुरीत वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे) २४ ऑगस्ट : – प्रेरणा पतसंस्थेची सातवी शाखा वांबोरी येथे सुरू होणार आहे. या शाखेचा उद्घाटन सोहळा उद्या सोमवारी सकाळी १०:३० वाजता मार्केट कमिटी गेटजवळ होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी दिली.
या शाखेचे उद्घाटन डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरुण साहेब तनपुरे यांच्या हस्ते होणार आहे. प्रेरणा पतसंस्थेच्या ठेवी सुमारे १२५ कोटी रुपये असून, ७७ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. ३२ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेने २० वर्षांपूर्वीच आपले कामकाज पूर्णपणे संगणकीकृत केले आहे.
वांबोरी शाखेत ग्राहकांसाठी कोअर बँकिंग आणि इतर सर्व अत्याधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध असतील. संस्थेचे स्वतःचे मोबाईल ॲप देखील आहे, ज्यामुळे ग्राहकांना विविध सेवांचा लाभ घेणे सोपे होईल. या सुविधेमुळे वांबोरीच्या बाजारपेठेतील ग्राहकांची अनेक वर्षांपासूनची अडचण दूर होईल, असे सुरेश वाबळे यांनी सांगितले.
यापूर्वी संस्थेच्या गुहा, म्हैसगाव, तांभेरे, राहुरी, आंबी, आणि श्रीरामपूर येथे शाखा आहेत. पुढील महिन्यात ब्राह्मणी आणि देवळाली प्रवरा येथेही नवीन शाखा सुरू केल्या जातील, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र हुरुळे यांनी दिली.