राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे )२३ ऑगस्ट : कै. सौ. केशरबाई तनपुरे नागरिक सहकारी पतसंस्था, राहुरी यांनी थकबाकीदार कर्जदार चंद्रभान भाऊ तनपुरे यांच्या गट क्र. 166/3/ब पैकी 67 आर क्षेत्राची मालमत्ता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 100(2) नुसार ताब्यात घेतली आहे.
संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कर्जदार चंद्रभान तनपुरे यांनी कर्जाची रक्कम भरली नसल्यामुळे संस्थेने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, राहुरी यांच्याकडून वसुली दाखला मिळवला होता. त्यानंतर वसुली अधिकाऱ्यांनी ही स्थावर मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव पुकारला होता. मात्र, लिलावात कोणीही बोली लावण्यासाठी पुढे न आल्याने संस्थेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 101 व नियम 85 नुसार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अहमदनगर यांच्याकडे प्रस्ताव दाखल करून हस्तांतरण प्रमाणपत्र मिळवले.
या सर्व प्रक्रियेनंतर, संस्थेने थकबाकीदाराकडून मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अहमदनगर यांच्याकडे पुन्हा प्रस्ताव सादर केला. जिल्हा उपनिबंधकांनी रावसाहेब खेडकर, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, राहुरी यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केले.
दिनांक 20/08/2025 रोजी प्राधिकृत अधिकारी रावसाहेब खेडकर यांनी ग्राम महसूल अधिकारी रवींद्र बाचकर यांच्या उपस्थितीत कर्जदार चंद्रभान तनपुरे यांच्याकडून या मालमत्तेचा ताबा संस्थेचे चेअरमन सागर सोमनाथ तनपुरे यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी, सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर, ग्राम महसूल अधिकारी रवींद्र बाचकर, संस्थेचे चेअरमन सागर तनपुरे, तसेच संस्थेचे पदाधिकारी, वसुली अधिकारी आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. यात जी.के. मुसळे, कैलास खर्डे, शिवाजी वराळे, दादासाहेब ठोकळे, संदीप तागड, प्रकाश तनपुरे, संजय वराळे, संतोष आघाव, संजय मोरे, उदावंत महेश, विजय उंडे, रोकडे तन्मय, तुळशीराम तनपुरे यांच्यासह गणेश वैजनाथ, पवार तुषार, बाळासाहेब काळे, एकनाथ बरडे, दादासाहेब शिरसाठ, रामराव नितीन वराळे, प्रविण घोरपडे, बाळू रोकडे, अमोल तनपुरे, अक्षय तनपुरे, सचिन वराळे, शुभम वराळे, शेळके अजय, गणेश वराळे, तसेच वकील जालिंदर ताकटे, ऍड. आर.के. सोनवणे, ऍड. प्रविण भिंगारदे आणि इतर अनेक नागरिक उपस्थित होते.