मुळा धरणातून नदीपात्रात पाणी सोडले

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे )२२ऑगस्ट : मुळा पाटबंधारे विभागाने आज, दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजता मुळा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यातचे आदेश मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिल्याने मुळा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले    . मुळा धरणातील वाढलेला पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे मुळा पाटबंधारे उपविभागीय अभियंता विलास पाटील यांनी सांगितले .

धरणातील पाणीसाठा २५,००० दशलक्ष घनफूट (दलघफु) इतका झाला आहे, तर जलाशयाच्या परिचालन सूची (ROS) नुसार तो २४,८८५ दलघफु इतका ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे, धरणातून मुळा नदीपात्रामध्ये १५०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडले गेले .

जर गरज पडल्यास, आपत्कालीन परिस्थितीमध्ये हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवला जाऊ शकतो.

नदीकाठच्या गावांसाठी सूचना
या पार्श्वभूमीवर, मुळा नदीकाठच्या गावांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी सतर्क राहावे. नदीपात्रातील त्यांची मालमत्ता, वस्तू, वाहने, पाळीव प्राणी, शेतीची अवजारे आणि इतर महत्त्वाची संसाधने सुरक्षित स्थळी हलवावीत असे आवाहन शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी केले .

नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये आणि कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *