राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ), १८ ऑगस्ट : राहुरी कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा ‘गोल्डन ग्रुप’ गेली सात वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहे. १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनानिमित्त या ग्रुपने राहुरी आणि बारागाव नांदूर येथील शाळांना मदत करून सामाजिक बांधिलकी जपली.
या उपक्रमांतर्गत, बारागाव नांदूर येथील नूतन मराठी शाळा, बारागाव नांदूर मराठी शाळा आणि बारागाव नांदूर उर्दू शाळा यांना प्रत्येकी १,००० रुपये देण्यात आले. तसेच, मल्हारवाडी येथील रामगिरी विद्यालयालाही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी १,००० रुपयांची मदत करण्यात आली.
यावेळी, ग्रुपचे सदस्य उदय पाटोळे यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ राहुरीच्या नूतन मराठी शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले.
गोल्डन ग्रुपची सामाजिक कामातील सातत्यपूर्ण कामगिरी
गोल्डन ग्रुप नेहमीच गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, वृक्षारोपण करणे आणि इतर सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असतो. त्यांच्या या कामामुळे त्यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी ग्रुपचे सदस्य युसुफ भाई देशमुख, मच्छिंद्र गुलदगड, दिलीप गागरे, राजेंद्र पवार, संजीवनी जावरे, मीरा देठे, महेबुब शेख, शिवाजी खामकर, संगीता शेळके, पुष्पा वाघचौरे, मनीषा टाक, संगीता वाघ, शोभा लोंढे, अनुष्का मॅडम, शिंदे सर, शारदा धोंगडे, बाबासाहेब सांगळे, संगीता धाडगे, अनिता गुंड, अर्चना मानकर, संगीता घाडगे, अनिता वरघूडे, दशरथ औटी यांनी विशेष सहकार्य केले.
या सामाजिक कार्याबद्दल संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी गोल्डन ग्रुपच्या सर्व सदस्यांचे आभार मानले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.