राहुरी वेब प्रतिनिधी,(शरद पाचारणे),१४ ऑगस्ट: – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, प्रदेश महमंत्री विजय चौधरी तसेच संघटन मंत्री रवि अनासपुरे यांच्या मान्यतेने अहिल्यानगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी भाजपाची दक्षिण जिल्ह्याची जंबो कार्यकारणी जाहिर केली आहे. यामध्ये राहुरी येथील अमोल भनगडे यांची जिल्हा सरचिटणीस पदी सुरेशराव बानकर व रवींद्र म्हसे यांची जिल्हा चिटणीस पदी तसेच महेंद्र तांबे यांची किसान मोर्चा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.
जिल्हा कार्यकारिणी मध्ये दहा उपाध्यक्ष, चार सरचिटणीस, दहा चिटणीस, कोषाध्यक्ष, कार्यालय प्रमुख, प्रसिद्धी प्रमुख तसेच ६१ कार्यकारणी सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
राहुरी तालुक्यातून जिल्हा सरचिटणीसपदी गणेगाव येथील अमोल भनगडे, जिल्हा चिटणीस पदी ब्राम्हणी येथील सुरेशराव बानकर, आरडगाव येथील रविंद्र म्हसे, बारागाव नांदूर येथील सुकुमार पवार यांची, तसेच किसान मोर्चा सरचिटणीस पदी ब्राम्हणी येथील महेंद्र तांबे यांची, तर अल्पसंख्यांक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदी बारागाव नांदूर येथील समीर पठाण यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. या निवडीबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन आ. शिवाजीराव कर्डिले, माजी खा. डॉ.सुजय विखे पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.