राहुरी,२ ऑगस्ट (प्रतिनिधी शरद पाचारणे) : राहुरी शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आझाद गणेशोत्सव मंडळाच्या २०२५ वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. मंडळाच्या सदस्यांच्या बैठकीत एकमताने ही निवड करण्यात आली, ज्यामध्ये अमृत कैलास दहिवाळकर यांची अध्यक्षपदी, गणेश संजय ढोले यांची उपाध्यक्षपदी तर भैय्या गायकवाड यांची सचिवपदी निवड करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद प्रदीप गाडेकर होते.
१९६३ साली राहुरी शहरातील आझाद चौकात विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या तरुणांनी आझाद गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली होती. तेव्हापासून हे मंडळ विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रम राबवून शहरात मानाचे स्थान मिळवले आहे. अनेक मान्यवरांनी या मंडळाचे अध्यक्षपद भूषवले आहे.
२०२५ चा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, या वर्षीच्या कार्यकारिणीत खजिनदारपदी अभिजित सुनील राऊत, उपखजिनदारपदी संपत दाभाडे यांनाही संधी मिळाली आहे. या बैठकीसाठी प्रदीप गाडेकर, गणेश खैरे, संतोष पोपळघट, सुनील राऊत, भीमराज रणसिंग, अनिल गुंजाळ, राजेंद्र गुंजाळ, अमोल काशिद, रवी गुंजाळ, अभिजित नरवडे, यश पोपळघट, प्रथमेश पोपळघट, प्रज्वल खैरे, अक्षय खैरे, अमोल रणसिंग, ओम पोपळघट, विकी गुंजाळ, सुनील पगारे, यश खैरे, विलास नेवरे, अतुल सोहनी, अविनाश वडतिले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आझाद मंडळातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात, ज्यातून समाज प्रबोधनाचे कार्य केले जाते. या संदर्भात ज्येष्ठ सभासद गणेश खैरे यांनी माहिती दिली की, आझाद चौकाच्या सुशोभीकरणासाठी तसेच १०१ फूट उंचीचा भगवा ध्वज उभारण्यासाठी तालुक्याचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या विशेष प्रयत्नांतून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे.