राहुरी,२ ऑगस्ट (वेब प्रतिनिधी ,शरद पाचारणे ): शिवांकुर विद्यालयाची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कुमारी अक्षरा तमनर हिने राज्यस्तरीय गणित अबॅकस स्पर्धेत लक्षवेधी यश संपादन केले आहे. तिने या प्रतिष्ठित स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावला, ज्यामुळे विद्यालयाचे नाव उज्वल झाले आहे.
अक्षराने लेव्हल एकमध्ये अवघ्या पाच मिनिटांत ८४ बेरीज आणि वजाबाकीची गणिते अचूकपणे सोडवून आपली चुणूक दाखवली. अबॅकस परीक्षा ही गणित विषयासाठी अत्यंत उपयुक्त असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण होते, असे प्रतिपादन संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश पवार यांनी केले. त्यांनी अक्षराचे कौतुक केले आणि तिला मार्गदर्शन करणाऱ्या दुर्गा बारवेकर मॅडम यांचेही विशेष अभिनंदन केले.
डॉ. पवार यांनी याप्रसंगी नमूद केले की, चालू शैक्षणिक वर्षापासून शाळेत अबॅकस शिकवण्यासाठी पूर्णवेळ शिक्षक उपलब्ध आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या अबॅकस परीक्षेत सहभागी होऊन आपल्या गणिती कौशल्यांचा विकास करावा, असे आवाहन त्यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार यांनीही अक्षरासह सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या सोहळ्याला मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, सौरभ भांबल, ज्योती शेळके, प्रियंका पांढरे, शितल फाटक, सुजाता तारडे, प्रिया लांबे, अनिता लांबे, दुर्गा बारवेकर, सुनीता ढोकणे, मोहिनी पेरणे, रोहिणी हापसे, सुरेखा मकासरे, अनिता म्हसे, सोनाली कुमावत, शिपाई शारदा तमनर, वाहतूक विभाग प्रमुख अशोक गाडे, सखाराम बाचकर, अविनाश तनपुरे, नवनाथ गाडे, पिनू आहेर, नंदु गिरी, कैलास गडधे, चौधरी, अनिल गुंजाळ यांच्यासह अनेक पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.