राहुरी, वेब प्रतिनिधी ३१ जुलै (शरद पाचारणे): श्रीरामपूर येथील न्यायालयात अँड. दिलीप दत्तात्रय औताडे यांना पक्षकाराकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज राहुरी तालुका वकील संघाने तीव्र निषेध व्यक्त केला. गुरुवारी सकाळी ११ वाजता राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर लागू करण्याची मागणी करण्यात आली.
बुधवार, ३० जुलै २०२५ रोजी श्रीरामपूर येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात अँड. दिलीप दत्तात्रय औताडे हे एका पक्षकाराची उलट तपासणी करत असताना, संबंधित पक्षकाराने त्यांना कोर्ट हॉलमध्ये बेदम मारहाण करून जखमी केले. या भ्याड हल्ल्याचा राहुरी तालुका वकील संघाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
दिलेल्या निवेदनात, वकील संघाकडून शासनाकडे मागणी करण्यात आली आहे की, वकिलांच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेला “वकील संरक्षण कायदा” तातडीने अमलात आणावा. जर शासनाला हा कायदा आणायचा नसेल किंवा त्यास विलंब करायचा असेल, तर सर्व वकिलांना आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाने वितरित करावेत, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर राहुरी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड. ऋषिकेश मोरे, उपाध्यक्ष अँड. मच्छिंद्र देशमुख, सेक्रेटरी अँड. संदीप खपके यांच्यासह अँड. मुस्तफा शेख, अँड. गोरक्षनाथ रसाळ, अँड. कल्याणी पागिरे, अँड. प्रवीण भिंगारदे, अँड. सुभाष भंडारी, अँड. कचरू चितळकर, अँड. प्रकाश संसारे, अँड. बबन आघाव, अँड. रवींद्र गागरे, आणि अँड. कारभारी ढोकणे यांची नावे आहेत.
यावेळी नोटरी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अँड. विवेक तांबे, तसेच अँड. सुरेश तोडमल, अँड. डी. आर. तोडमल, अँड. बी. एस. बाचकर, अँड. प्रसाद कोळसे, अँड. प्रशांत मुसमाडे, अँड. योगेश शिंदे, अँड. ज्ञानेश्वर येवले, राहुरी तालुका बार असोसिएशनचे राहुल शेटे ,अँड वर्षा गागरे यांच्यासह मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते.