तोफखाना पोलिसांची मोठी कारवाई: घरफोडी करणारे आंतरराज्यीय आरोपी जेरबंद, लाखोंचा ऐवज हस्तगत

अहिल्यानगर विशेष प्रतिनिधी,३० (शरद पाचारणे ): तोफखाना पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका सराईत टोळीला अटक करून त्यांच्याकडून ५ लाख ४५ हजार रुपये किमतीचा १०० ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

गणेश सुधाकर मंचरकर (वय ४२, रा. प्लॉट नं. २०२, शिवसुधा रेसिडेन्सी, दसरे नगर, सावेडी, अहिल्यानगर) यांनी १५ जानेवारी २०२५ रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून ५३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३७/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३१७ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, कैलास चिंतामण मोरे ( रा. सोनगीर, जि. धुळे ),जयप्रकाश राजाराम यादव (रा. दिनदासपूर, जि. वाराणसी, उत्तर प्रदेश), रविंद्र आनंद माळी (रा. सोनगीर, जि. धुळे) आणि सुशील उर्फ सुनील ईश्वर सोनार (रा. बालाजीनगर, शिंगावे, जि. धुळे) यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या आरोपींना अटक केली असता, चौकशीदरम्यान त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी तीन ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली.

आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

गु.र.नं. ३७/२०२५: २,२०,०००/- रुपये किमतीची ३०.२९० मि.ग्रॅम वजनाची सोन्याची लगड.

गु.र.नं. १०००/२०२४: २,५५,०००/- रुपये किमतीची ५१.५०० मि.ग्रॅम वजनाची सोन्याची लगड.

गु.र.नं. ९९८/२०२४: ७०,०००/- रुपये किमतीची १४ मि.ग्रॅम वजनाची सोन्याची लगड.

एकूण ५,४५,०००/- रुपये किमतीची १०० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे. आरोपींनी चोरी केलेला मुद्देमाल काढून दिल्याने या घरफोडीच्या गुन्ह्यांची यशस्वीरित्या उकल करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री. सोमनाथ घार्गे, मा. अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री. वैभव कलुबर्मे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, नगर शहर विभाग, अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री. आनंद कोकरे, सहायक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण, पो.हे.कॉ. बाळासाहेब गिरी, गोरख काळे, दीपक गांगर्डे, भानुदास खेडकर, सुधीर खाडे, सुरज वाबळे, पो.ना. रमेश शिंदे पो.कॉ. सुमित गवळी, सतीश त्रिभुवन, भागवत बांगर (सर्व नेम- तोफखाना पो.स्टे. अहिल्यानगर) यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *