राहुरी वेब प्रतिनिधी,( शरद पाचारणे ) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना आपापल्या भागात जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले. पक्षाची सदस्यसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. अधिवेशन संपताच आपण राज्याच्या काही भागांचा दौरा करणार असून, राहुरी तालुक्यासाठी विशेष वेळ देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. राहुरी हे आपले आजोळ असल्याने यापुढे आपण राहुरीकडे अधिक लक्ष देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गेल्या आठवड्यात डॉ. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे आणि युवा संचालक हर्ष तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला होता. आज मुंबई येथील महिला विकास भवन येथे तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार धर्मराज आत्राम, डॉ. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे, संचालक हर्ष तनपुरे, तालुकाध्यक्ष दिलीप जठार, शहराध्यक्ष सुनील भट्टड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्यांनी आपापल्या भागात जबाबदारीने काम करावे आणि पक्षाचे सदस्य वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे पुन्हा अधोरेखित केले. राहुरी तालुक्यातील विकासकामांसाठी आपण सहकार्य करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
डॉ. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी हा राहुरी तालुक्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचे म्हटले. अजितदादा आणि पक्षश्रेष्ठींनी आम्हाला पक्षात प्रवेश दिला, याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. दादांचे राहुरी हे आजोळ असल्याने त्यांनी यापूर्वीही तालुक्याच्या विकासकामांना जशी मदत केली, तशी यापुढेही करतील, असा विश्वास तनपुरे यांनी व्यक्त केला. आज काही प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला असला तरी, जागेच्या अडचणीमुळे अनेक कार्यकर्ते येऊ शकले नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.
आज पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी संचालक विजय डौले, पंचायत समितीचे माजी सभापती वेणुनाथ कोतकर, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी उपाध्यक्ष दत्तात्रय पानसंबळ, अशोक विटनोर, मुळा प्रवरा वीज संस्थेचे माजी संचालक अय्युब पठाण, राहुरीचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, अरुणोदय पतसंस्थेचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उंडे, देवळाली प्रवराचे नगरसेवक आदिनाथ कराळे, माजी नगरसेवक दीपक साळवे, डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी संचालक नवनाथ ढोकणे, बाजार समितीचे माजी उपसभापती गोरक्षनाथ पवार, बाजार समितीचे संचालक दत्तात्रय शेळके, रखमाजी जाधव, रामदास बाचकर, उपसभापती दत्तात्रय कवाणे, डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक अशोक उर्हे, भास्कर ढोकणे, अरुण ढूस, टाकळीमियाचे माजी सरपंच सुरेश करपे, संचालक जनार्दन गाडे, बाजार समितीचे संचालक सुभाष डुकरे, मधुकर पवार, महेश पानसरे, आदर्श पतसंस्थेचे उपाध्यक्ष आबासाहेब वाळुंज, तबाजीअण्णा तनपुरे पतसंस्थेचे अध्यक्ष विलास तनपुरे, डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे, माजी संचालक आप्पासाहेब जाधव, जोगेश्वरी सेवा संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप भुजाडी, राहुरीचे माजी उपनगराध्यक्ष दशरथ पोपळघट, नगरसेवक नंदकुमार तनपुरे, डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी संचालक किशोर वने, सुखदेव चव्हाण यांचा समावेश होता.
आज सकाळी चेअरमन अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली २०० जीप गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला. यावेळी युवा नेते संचालक हर्ष तनपुरे, किसनराव जवरे, अरुण ठोकळे, सुरेश बाफना, उपसभापती बाळासाहेब खुळे, माजी उपसभापती रवींद्र आढाव, किशोर जाधव, अनिल कासार, सूर्यकांत भुजाडी, सुनील मोरे, दीपक तनपुरे, दिनकर पवार, राऊ काका तनपुरे, बाबासाहेब येवले, संजय साळवे, विजय करपे, द्वारकानाथ बडढे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
“राष्ट्रवादी काँग्रेस सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. विधिमंडळातील आमच्या एका सहकाऱ्याने चुकीची भूमिका मांडली. ते पक्षाचे धोरण नाही. त्यांच्याशी मी आज बोललो आहे. त्यांनी घेतलेली भूमिका आपल्या पक्षाची नाही, हे त्यांना समजून सांगितले आहे,” असेही आमदार संग्राम जगताप यांचा नामोल्लेख टाळून उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.