पंढरपूरकडे निघालेल्या दिंड्यांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवीभाऊ मोरे यांचा सहभाग

राहुरी वेब प्रतिनिधी ,३० ( शरद पाचारणे ):- ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असा जयघोष करत विठुरायाच्या भेटीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या विविध दिंड्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष रवीभाऊ मोरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विठू नामाचा जयघोष करत वारकऱ्यांसोबत उत्साहात सहभाग घेतला.

रवीभाऊ मोरे यांच्यासोबत ह.भ.प. मृदुंगाचार्य सचिनभाऊ गडगुळे, देवळाली प्रवरा येथील प्रमोद शेठ पवार, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष रविकिरण ढूस , आशुतोष ढमढेरे,किशोर वराळे, अनिकेत कुलकर्णी, आणि दीपक विधाटे हे देखील उपस्थित होते.

पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या दिंड्यांमध्ये सहभागी होऊन त्यांनी अनेक दिंड्यांना भेट दिली आणि टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठलाचा जयघोष केला. रुईछत्तीशी, मांदळी, मिरजगाव, निमगाव, जातेगाव यांसारख्या ठिकाणांहून निघालेल्या संत रोहिदास महाराज पायी दिंडी सोहळा, टाकळीमिया येथील शंकर-पार्वती महाराज पायी दिंडी सोहळा, स्वामी दत्त सेवा पायी दिंडी सोहळा, तसेच टाकळीमिया ते अक्कलकोट अग्निहोत्र दिंडी आणि देवळाली प्रवरा येथील त्रिंबकराज स्वामी महाराज पायी दिंडी सोहळा या प्रमुख दिंड्यांना भेट देऊन त्यांनी वारकऱ्यांचा उत्साह वाढवला. रवीभाऊ मोरे यांच्या या सहभागामुळे दिंड्यांमधील वारकऱ्यांमध्ये एक वेगळाच जोश संचारला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *